Yojana Doot Bharti 2024 : योजना दूत भरती 2024.

Yojana Doot Bharti 2024 – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व रोजगार व उद्योजकता नाविन्य विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामध्ये योजनांचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर खालील माहिती मध्ये दिल्याप्रमाणे योजना दूत निवडीचे निकष, अटी व शर्ती आहेत त्या वाचून आपण या भरतीसाठी अर्ज भरू शकता. याचा प्रमुख उद्देश हा महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिद्धी हे लोकांना नागरिकांना देणे हा आहे. याकरिता “मुख्यमंत्री योजना दूत” या पदाची नियुक्ती माननीय मुख्यमंत्री यांच्या यांच्या ऑफिस द्वारे केलेली जात आहे. यामध्ये ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या पद्धतीने 50 हजार योजना दूतांची नेमणूक केली जाणार आहे.

Yojana Doot Bharti 2024

शासन निर्णय क्र. – संकीर्ण 2024/प्र.क्र..151 / मावज – 1

एकूण पदे – 50000

पदाचे नाव – योजना दूत (Yojana Doot Bharti 2024)

yojana doot bharti 2024

योजना दूत म्हणजे नक्की काय ? 

  • महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती त्याचा प्रचार त्याची प्रसिद्धी करणे व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमाच्या अंतर्गत या योजना दूतांचे काम हे प्रामुख्याने संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घ्यायची त्या माहिती योजना दूतांनी त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्याने ठरवून दिलेल्या जी काम आहे ती पार पाडायची.
  • राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना यांनी ग्रामप पातळीवरती यंत्रणांशी समन्वय साधून शासनाची योजनांची माहिती घरोघरी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे. 

योजना दूत साठी पात्रता

  • 18 ते 35 वयोगटातील उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  •  कोणत्याही शाखेतील पदवीधर या योजना दूध साठी अर्ज भरू शकतात.
  •  संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
  •  अर्ज भरणारे उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे.
  •  उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्याकडे त्याचा डोमेसाईल असावा.
  •  उमेदवाराच्या आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी संलग्न असावे.

योजना दूत भरतीसाठी लागणारी कागदपत्रे

  • मुख्यमंत्री योजना दूत या फॉर्म साठी ऑनलाईन केलेल्या अर्ज.
  •  आधार कार्ड
  •  पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा त्याची कागदपत्रे आणि त्याचं प्रमाणपत्र.
  •  अधिवास दाखला म्हणजेच डोमासाईल दाखला.
  •  बँक खात्याचा तपशील
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  हमीपत्र (  ऑनलाइन अर्जामध्ये दिले आहे.)

योजना दूत  पगार – 10,000/- महिना


हे पण पहा  पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 3317 जागांसाठी भरती..


योजना दूतांची कामे 

  • वरील सर्व माहिती वाचून आपल्याला योजना दूत म्हणजे काय त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्याचा सिलेक्शन प्रोसेस हे सगळी माहिती मिळाली असेल तर आता आपण बघूया योजना दूत जे काम करणार आहे त्या कामाचे स्वरूप कसं असणार  आहे.
  1. योजना दूत  संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
  2.  प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेलं काम आहे ते काम पार पाडायचा आहे आणि हे त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे.
  3.  योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळीवरील यंत्रणांची समन्वय करून शासनाची योजनांची माहिती घरोघरी जाऊन लोकांना ती माहिती देतील.
  4.  योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुनेतील अहवाल तयार करून तो अपलोड करायचा आहे.
  5.  योजना दूत त्यांनी सोपवलेल्या जबाबदारी स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच त्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा गैरव्यवर्धन कोणत्याही करणार नाहीत योजना दूत तसं करतात असे निदर्शनास आल्यात त्यांच्यासोबत केलेला करार संपुष्टात आणून त्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे .
  6. योजना दूत अनाधिकृत रीत्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना त्या पगार मिळणार नाही.

Yojana Doot Bharti 2024 – जाहिरात (pdf) पहा

Yojana Doot Bharti 2024 – Click here

Leave a Comment