DRDO Bharti 2026 – शासनाच्या संरक्षण, संशोधन व विकास या विभागामध्ये नोकरीसाठी खूप मोठी संधी आलेली आहे. फक्त आपण इंजीनियरिंग (Jobs For Engineers) केलेला असले पाहिजे किंवा तुमचं MSC झाले असले पाहिजे. तेही खाली दिलेल्या ट्रेडमध्ये. वयाची अट, शैक्षणिक पात्रता, पगार, इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. तर ही माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. जर आपण या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र नसाल तर खालीलपैकी शिक्षण झालेल्या कोणत्याही आपल्या मित्र-मैत्रिणींना या भरतीसाठी ची माहिती किंवा ही लिंक शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीचा अर्ज करता येईल.
DRDO Bharti 2026, DRDO Recruitment 2026, DRDO Jobs 2026, Defence Jobs 2026, Defence Nokari
थोडक्यात
| पदाचे नाव | सायंटीस्ट |
| एकूण पदसंख्या | 33 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 जून 2026 |
| पगार | 67,700 ते 1,23,100 रु प्रती महिना |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – 157
एकूण पदसंख्या – 33 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सायंटीस्ट “E” | 02 |
| 2 | सायंटीस्ट “D” | 11 |
| 3 | सायंटीस्ट “C” | 20 |
| एकूण | 33 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech (Electronics & Communications / Indistrial Engineering/Prodcution/ Mechanical) ii) 11 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech (Computer Science / Opto Electronics/Aerospace/Mechanical/Physics Engineering किवा M.SC (Physics/Photonics) ii) 07 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) प्रथम श्रेणी मध्ये B.E/B.Tech (Chemical/Electrical/Civil/GIS/Remote Sensing/Pharmacology/Geomatics Electronics/Chemical Engineering Physical Oceanography ) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 19 जून 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षांची सूट ]
- पद क्र 1 – 45 वर्षांपर्यंत
- पद क्र 2 – 45 वर्षांपर्यंत
- पद क्र 3 – 35 वर्षांपर्यंत
फी –
- General/OBC/EWS – 100 /- रु
- SC/ST/PWD/महिला –फी नाही
पगार (Salary)
- पद क्र 1 – 1,23,100 /- रु प्रती महिना
- पद क्र 2 -78,800 /- रु प्रती महिना
- पद क्र 3 -67,700 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- या भरतीसाठी आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करूनच मग या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
- तर अर्ज भरण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाहिरात वाचावी लागणार आहे कारण जाहिरातीमध्ये खूप तपशील मध्ये माहिती दिली आहे त्यामध्ये आपले शैक्षणिक पात्रता कोणत्या पदासाठी किती शिक्षणाची अट असणारे त्या नंतर नोकरीचे ठिकाण काय असणार आहे आणि मी म्हणजे त्यामध्ये अनुभव आहे जो अनुभव त्यांना पाहिजे आहे तर तो अनुभव कोणत्या क्षेत्रामधला असणार आहे ही सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- तर दिलेली जाहिरात वाचा आणि मगच या भरतीसाठीच अर्ज करायला सुरुवात करा अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती खरी योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपला अर्ज कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- या भरतीसाठी चा अर्ज करताना आपली शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायचे त्यामध्ये आपल्याजवळ प्रमाणपत्र आणि गुणपत्रक दोन्ही असणं आवश्यक आहे त्यावरती दिलेले मार्क्स आपण पास झालेले वर्ष व इतर सर्व माहिती योग्य व बरोबर लिहावी.
- भरतीसाठी चा अर्ज भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती परत एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी ची प्रोसेस करावी.
- ज्या प्रवर्गामध्ये आपल्याला फी भरावी लागणार आहे त्या प्रवर्गाची फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी चा अवलंब करू शकता.
- ज्या प्रवर्गामध्ये एक आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही किंवा जर आपण महिला असाल तर आपण भरलेला फॉर्म एकदा चेक करायचा आहे फॉर्म मध्ये सर्व माहिती योग्य बरोबर असलेली खात्री करून मग आपला अर्ज डायरेक्ट जमा होईल.
- अर्ज जमा झाल्यानंतर आपण भरलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारचे नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप अगदी निशुल्क जॉईन करा.
- तसेच ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ फॉरमॅटमध्ये हवी असेल तर युट्युब वरती जाऊन नोकरी बघा सर्च करा आणि आपले हे व्हिडिओज पहा.
- फॉर्ममध्ये भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती समजत नसल्यास जाहिरात मध्ये दिलेल्या पीडीएफ मधील तांत्रिक अडचणींसाठी कॉल करण्यासाठी एक नंबर दिला आहे त्या नंबर वरती कॉल करा आणि आपला प्रश्न त्यांना विचारावा किंवा आपण तिथेच दिलेल्या ईमेल आयडी वरती देखील संपर्क साधू शकता.