नमस्कार मित्रानो मी वैभव पवार. सांगली या गावचा रहिवासी मी nokaribagha.com हि वेबसाईट चालवत आहे. मी नोकरी बघा वेबसाईट चालू करणे पाठीमागचा सगळ्यात मोठं कारण म्हणजे मी माझी बारावी झाल्यानंतर एक अनुभव घेतला, की सरकारी नोकरी, निमशासकीय नोकरी अशा बऱ्याचशा नोकरीचे जाहिराती निघत असतात पण आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे आपण त्या पदासाठी अर्ज करू शकत नाही. आणि अशा अपुऱ्या माहितीमुळे कित्येक जणांचा सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्न भंग होतात. त्या दिवशी मी ठरवले की आपण ही वेबसाईट बनवायची आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आपण सर्व सरकारी नोकरी योजना या सर्वांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायची.
मित्रांनो मी माझ्या वेबसाईटच्या माध्यमातून सगळ्या योजना, सगळ्या भरती यामध्ये सरकारी, निमसरकारी या सर्व गोष्टींची माहिती देत आहे. या माहितीचा वापर करून भरपूर जणांना नोकरी मिळालेली आहे. भरपूर जणांना योजनेचे फायदे मिळाले आहेत. तर माझा मुख्य उद्देश या वेबसाईटवरून सर्वांचा फायदा करून देणे हा आहे.. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.