IDBI Bank Bharti 2024 : IDBI Bank Executive Bharti 2024 नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) या पदांसाठी जवळपास 1000 जागांची भरती IDBI बँकेमध्ये निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2024 ही आहे.
IDBI Bank Bharti 2024
जाहिरात क्र – 09/2024-25
एकूण पदसंख्या – 1000
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO) | 1000 |
एकूण | 1000 |
IDBI Bank Bharti 2024 Educational Qualifications –
शैक्षणिक पात्रता –
i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणक प्रविणता असणे अपेक्षित आहे.
वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Form Fees
जनरल / OBC / EWS 1050 /- SC / ST / PWD – 250/-
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
पगार –
- प्रथम वर्ष – 29,000/- rs
- द्वितीय वर्ष – 31,000/- rs
IDBI Bank Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
IDBI Bank Bharti 2024 Starting Date | 07 नोव्हेंबर 2024 |
IDBI Bank Bharti 2024 Last Date | 16 नोव्हेंबर 2024 |
IDBI Bank Bharti 2024 परीक्षा | 1 डिसेंबर 2024 (रविवार) |
IDBI Bank Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- सदर भरती हि IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला खूप कमी स्टेप्स मध्ये हा फॉर्म भरता येईल. खाली दिलेल्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरू शकता.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून भरती च्या मेन पेज वर क्लिक करावे.
- Click Here For New Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्यला पुढे जायचे आहे.
- वरती दिलेल्या बॉक्स मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. त्यामध्ये विचारला जाणार इमेल आयडी व मोबाईल नंबर चालू द्यावा. जेणेकरून फॉर्म भरताना तो इमेल रजिस्टर होणार आहे, व त्याच इमेल आयडी वरती तुम्हाला भरतीच्या या फॉर्म चा युजर आयडी येणार आहे.
- हि सर्व माहिती भरून झालेनंतर आपल्याला अर्ज पुढे भरायचा आहे.
- त्या नंतर च्या प्रोसेस मध्ये या फॉर्म मध्ये आपल्यला आपला फोटो व सही अपलोड करायची आहे. या मध्ये फोटो ची साईझ हि 20 ते 50 kb च्या आत असावी व सही हि 10 ते 20 kb च्या आत असावी.
- याच्या नंतर आपल्याला पुढे विचारली जाणारी सर्व माहिती भरायची आहे.
- आपल्या शैक्षणिक माहिती हि देखील व्यवस्थित भरायची आहे.
- या भरती मध्ये आपल्याला कोणतीही कागदपत्रे स्कॅन करून जोडायची नाही आहेत.
- खाली दिलेलं सेल्फ डिक्लेरेशन स्वताच्या हातानी लिहून जोडायचे आहे.
“I________(Name of the candidate), _(Date of Birth) hereby declare that all the
information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the
supporting documents as and when required. The signature, photograph and left-hand thumb impression is of mine”.
- हे भरून स्कॅन करून अपलोड करायचे आहे. याची साईज हि 50 ते 100 kb च्या आत असावी.
- तसेच यासोबत आपल्या डाव्या हाताचा अंगठा स्कॅन करून जोडायचा आहे.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवटची तारीख हि 16 नोव्हेंबर 2024 हि आहे.
सुचना - वरती दिलेली माहिती हि नोकरीबघा यांनी विविध स्त्रोताने घेतलेली आहे. या जाहिरातीमध्ये काही चुका राहू शकतात. आपण फॉर्म भरताना कृपया वरील मूळ जाहिराती मध्ये असलेली माहिती बघावी.