Satara Dcc Bank Bharti 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये 323 जागांसाठी भरती..

Satara Dcc Bank Bharti 2024 : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच सातारा डीसीसी बँक भरती 2024 निघाली आहे. 323 जागांसाठी कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांसाठी अनुक्रमे 263 व 60 अशा जागा निघालेल्या आहेत. कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात. जर आपण बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आपण खालील माहिती पूर्ण वाचून या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदाचे नाव तसेच एकूण पदसंख्या भरली जाणारी फी या सगळ्या माहिती खाली दिलेल्या आहेत त्या वाचून आपण या पदासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 अशी आहे.

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

Satara Dcc Bank Bharti 2024

Satara Dcc Bank Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जाहिरात क्र –  

एकूण पदसंख्या – 323

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1कनिष्ट लेखनिक ( Junior Clerk)263
2कनिष्ट शिपाई (Junior Peon)60
 एकूण जागा323

Satara Dcc Bank Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कनिष्ट लेखनिक – i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) MSCIT किवा समतुल्य ii) बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
  • कनिष्ट शिपाई – i) 10 वी पास ii) इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक.

वयाची अट – 31 जुलै 2024 रोजी

  • पद क्र 1 –  21 ते 38 वर्षे  
  • पद क्र 2 –  18 ते 38 वर्षे

फॉर्म फी –  590/- रुपये

  • नोकरी ठिकाण – सातारा

पगार – जाहिरात मध्ये माहिती नाही.

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख13 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2024

हि भरती पहिली का ? पश्चिम मध्य रेल्वेमध्ये 3317 जागांसाठी भरतीलवकर करा अर्ज


Satara Dcc Bank Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक

भरती जाहिरात (PDF) पहा
अधिकृत वेबसाईटपहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा.
नोकरीबघा whattsapp groupजॉईन व्हा

Satara Dcc Bank Bharti 2024 How to Apply ?

  • वरील सर्व माहिती वाचून आपल्याला अर्ज करा यावरती क्लिक करा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती आपले पद त्यासाठी लागणारी वयोमर्यादा त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्र हे सर्व वाचून आपण कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई यामधील ज्या पदासाठी अर्ज भरणार आहे त्या पदावरती क्लिक करून आपण अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.
  • भरतीच्या मेन वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रिक्रुटमेंट सेक्शन ओपन होईल त्यामध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन नवीन नोंदणी वरती क्लिक करायच आहे. आणि आपल्याला आपली आधार कार्ड नंबर, आपले नाव, पोस्ट तसेच आपला ई-मेल आयडी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
  • आपण अर्ज केलेल्या पदाला अनुसरून जी शैक्षणिक अर्हता आपण प्राप्त केली आहे त्याचे प्रमाणपत्र व्यवस्थित स्कॅन करून जोडायचे तसेच त्यामध्ये दिलेले मार्क तुमची टक्केवारी व्यवस्थित बघून टाकायचे आहे.
  • आपला फोटो, सही, आधार कार्ड या सर्व गोष्टी त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्यासाठी लागणारी जी परीक्षा शुल्क 500 + 18% जीएसटी अशी 590 रुपये आपल्याला त्यामध्ये आपल्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग वरून जमा करायचे आहेत ते जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची एक प्रत प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची आहे.
  • कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदांकरिता कम्प्युटर द्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन परीक्षा हे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या 90 प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुणांसाठी याप्रमाणे 90 गुणांचे राहील त्यामध्ये परीक्षेसाठी सर्व विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल आपल्याला या प्रमाणही परीक्षा द्यायचे आहे.
  • परीक्षा झाल्यानंतर उमेदवार जे मुलाखतीस पात्र असतील त्यांच्या परीक्षेचा बैठक क्रमांक हा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यानंतर त्या पात्र झालेल्या उमेदवारांना शैक्षणिक आणि संबंधित मूळ कागदपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घ्यायचे त्यानंतर त्यांच्या मुलाखत पत्र हे ऑनलाईन बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. ते डाऊनलोड करून आपल्याला मुलाखतीस जायचे आहे. आणि तेव्हा आपली सर्व कागदपत्रे मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र तिथे सादर करायचे आहेत.
दररोज नवनवीन नोकरीसाठीच्या भरती निघत असतात. पण आपल्याला त्या माहिती पडत नाहीत त्यासाठीच आपण नोकरी बघा तर्फे छोटासा उपक्रम घेतलेला आहे. की आपला व्हाट्सअप चा ग्रुप सुद्धा चालू केला आहे. त्यामध्ये आपल्याला भरतीच्या जाहिराती, माहिती, कसा अर्ज करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या व्हाट्सअप वर सुद्धा मिळतात तसेच बाकीचे म्हणजे योजनेच्या माहिती, नवीन कोणती स्कीम चालू झाली, त्याची माहिती सरकारच्या खूप अशा योजना की ज्या ज्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. 
या सगळ्या गोष्टी आपण नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप वरती आपण देतोय सगळी माहिती याच्यावरती आपल्याला मिळते. तर आपल्याला अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुपला सहभागी व्हा. वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Leave a Comment

तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबी…चंद्राबाबू लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? या नोकरीसाठी स्टेट बँक देत आहे. 60 लाख रुपये वार्षिक पगार… बँक ऑफ बडोदा: आकर्षक पगार आणि फायदे असलेली नोकरी..