शेतकऱ्यानो हा फॉर्म भरा आणि दर वर्षी 6000 रु मिळवा. Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025पी एम किसान योजना (Pm Kisan Yojana) म्हणजेच पंतप्रधान कृषी योजना ही योजना मुख्यत्वे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी एक ठराविक रक्कम खात्यावर देण्याच्या उद्देशाने बनवलेली ही योजना यामध्ये आपण पेन्शन म्हणू शकतो की पेन्शन टाईप एक रक्कम दरवर्षी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेच्या मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही योजना कोणीही शेतकरी घेऊ शकतात ज्याची जमीन दोन हेक्टर पेक्षा कमी आहे तसेच कमीत कमी कागदपत्रांचा वापर करून आपण योजनेचा अर्ज भरू शकतो. आपण खाली दिलेल्या माहितीमध्ये हे सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत तसेच आपण जर शेतकरी असाल तर कशा पद्धतीने आपण आपले पीएम किसान नोंदणी करू शकतात ही सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025

Pm किसान योजना काय आहे ? What Is PM Kisan ?

pm किसान योजना हि केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी असणारी एक योजना आहे. या मध्ये शेतकऱ्याना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाकडून दर वर्षी 6000 रुपये पेन्शन स्वरुपात त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये मिळतात.

कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात ? Who can apply for this scheme ?

शेत जमीन असणारे कोणीही शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. फक्त ती शेतजमीन हि 02 हेक्टर पेक्षा कमी असावी. असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी अपात्र लाभार्थी कोण असणार आहेत ? Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025 Not Eligible ?

हि योजना 2 हेक्टर पेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असल्या मुळे खालील घटक/लाभार्थी अपात्र होऊ शकतात.

  • जमीन धारण करणारी संस्था
  • आजी / माजी आमदार, खासदार
  • आयकर भरणारी व्यक्ती
  • 10000 पेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारी व्यक्ती.
  • संवैधानिक पदावरील कोणीही व्यक्ती
  • नोंदणी कृत डॉक्टर/वकील
  • आजी/माजी सर्व व्यक्ती
  • तसेच समाजातील आणखी काही घटक जे उत्पन्न रेषेच्या पुढे जातात.

या योजनेसाठी अर्ज कसा करावा ? How to apply Pm Kisan Yojana ?

या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याजवळ आधार कार्ड

  • आपल्या शेताचा उतारा (7/12, 8 अ)
  • राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
  • आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर देखील लिंक असावा
  • रेशन कार्ड

कागदपत्रे वापरून आपण शासनाच्या पी एम किसान या पोर्टल वरती जाऊन आपलं आपली नोंदणी करू शकता. यामध्ये अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपल्याला संगणकाच्या मुख्य श्रेणीवर शेतकरी हा पर्याय दिसेल यामध्ये नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपण शेतकरी नोंदणी करू शकता. पण आता जर आपण या योजनेला अर्ज करणार असाल तर आपल्याला ॲग्री स्टॅक या वेबसाईटवरून किसान कार्ड देखील काढावे लागणार आहे. किसान कार्ड काढल्यानंतर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025

pm किसान योजना अर्ज कसा करावा ? How to register in pm kisan sanman nidhi yojana ?

  • pm किसान योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आपण खालील पद्धतीने पुढे जाऊ शकता.
  • सर्वप्रथम आपल्याला वरती सांगितल्याप्रमाणे आपले आधार कार्ड शेताचा 7/12 उतारा व 8 अ उतारा तसेच आपल्या बँक पासबुक रेशन कार्ड इत्यादी सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला आपला फार्मर आयडी काढायचे आहे. फार्मर आयडी काढल्यानंतर तो फार्मर आयडी नंबर घेऊन आपल्याला पुढील प्रमाणे प्रोसेस करून Pm Kisan या योजनेला नोंदणी करायचे आहे.
Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025
  • वरती दाखवल्याप्रमाणे आपल्याला नवीन नोंदणी करण्यासाठी अशा प्रकारचा संगणकीकृत पान ओपन होतं यामध्ये नवीन फार्मर रजिस्ट्रेशन (pm.kisan.gov.in) फॉर्म असं दिलेलं असेल त्यामध्ये आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तसेच आपला आधार लिंक्ड मोबाईल नंबर टाकून स्टेट सिलेक्ट करायचे आणि दिलेला सिक्युरिटी कोड टाकून GET OTP या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025 आपल्याला OTP टाकायचा आहे. त्यानंतर आपण पुढे pm किसान च्या मुख्य पानावर येता. त्यानंतर आपल्याला विचारलेली सर्व माहितीव्यवस्थित बघून टाकायची आहे.
  • यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या बेसिक डिटेल्स असतील त्यामध्ये आपले नाव जन्मतारीख आपला पत्ता तसेच त्यानंतर शेताची सर्व माहिती शेताचा आपल्या सर्वे नंबर तसेच आपल्याला जिल्हा, तालुका, गाव अशा सिक्वेन्स सर्व माहिती सिलेक्ट करायचे आहे. त्यासोबतच आपल्याला आपल्या सातबारा उताऱ्याची स्कॅन कॉपी देखील अपलोड करायचे आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, अपलोड करून आपण हा फॉर्म अगदी शेवटी सबमिट करायचा आहे.
  • सबमिट केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती ओटीपी आणि आपल्याला रजिस्ट्रेशन ची माहिती देखील तेव्हाच येईल दिलेल्या ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाले आहे असा कन्फर्म मेसेज येईल.
  • ही सर्व माहिती आपल्या तालुका अधिकाऱ्यांजवळ (कृषी अधिकारी) जाईल आणि त्यानंतर तिथे व्हेरिफाय होऊन मग आपल्याला आपले पीएम किसान ची नोंदणी सक्सेस होईल. Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025 योजनेच्या अतिरिक्त माहितीसाठी आपल्यला कृषी अधिकारी डेस्क वर माहिती मिळु शकते.
  • याचा आपल्याला स्टेटस चेक करायचा असल्यास खाली लिंक वर चेक करून आपण आपल्या पीएम किसान योजनेचा स्टेटस चेक करू शकतात यासाठी आपल्याला आपला Registration नंबर मिळून जाईल Registration नंबर टाकून आपण आपली माहिती बघू शकतात एम एच नंबर म्हणजे आपल्या रजिस्ट्रेशन नंबर जो की आपण पीएम किसान या योजनेसाठी वापरतोय.

Pm Kisan Status List

खालील लिंकवर क्लिक करून आपण या योजनेच्या आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.

Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025
  • माझ्या प्रिय मित्रांनो ही सर्व माहिती आपल्याला नोकरी बघायच्या माध्यमातून रोजच्या रोज आपले व्हाट्सअप वरती मिळवायचे असेल तर वरती दिलेली लिंक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
  • जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्याजवळ येत राहील.
  • या सरकारी योजना या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या सरकारने बनवलेले आहेत तर आपण या योजनेचा लवकरात लवकर फायदा घेऊन दरवर्षी आपल्या खात्यावरती सरकारचे सहा हजार रुपये घेऊ शकता. Pm Kisan Sanman Nidhi Yojana 2025
  • सदर योजना मंजुरीचे अधिकार हे पूर्णपणे सरकारकडे आहे त्यामुळे आपण या प्रकारचे योजनांसाठी कुठल्याही खाजगी एजंट यास पैसे देऊन हे काम करून घेऊ नका.
  • हे काम कोणत्याही वशिल्याने होत नाही या कामासाठी आपल्याला सरकारने दिलेल्या नियम व अटी पाळून आपल्या आपल्याला अर्ज भरावा लागणार आहे.
  • आपली जर कागदपत्रे क्लियर असतील तर आपल्याला या योजनेचा लाभ हा शंभर टक्के मिळणार आहे यासाठी आपल्याला कुठेही कोणाला एकही रुपया द्यायची गरज नाही आहे.

Leave a Comment