Sangli DCC Bank Bharti 2026 – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीसाठी मोठी भरती ती पण फक्त पदवीधरांसाठी सुरु झालेली आहे आपण पण पदवीधर असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा. आणि बँकेत नोकरीचे आपले स्वप्न पूर्ण करा. सर्व माहिती अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
Sangli DCC Bank Bharti 2026, Clerk Bharti Sangli, DCC Bank Sangli Recruitment, Clerk Jobs In sangi bank, Sangli Bank Bharti
पदाचे नाव – लिपिक (clerk)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर (कृपया संपूर्ण जाहिरात वाचावी.)
नोकरीचे ठिकाण – सांगली

अर्जाची पद्धती – ऑनलाईन
भरतीसाठी ची फी – 1180 /- रु (1000 फी + 18 % GST)
अर्ज सुरु झालेली तारीख – 24 जून 2026
अर्जाची शेवटची तारीख – 08 जुलै 2026
बँकेची अधिकृत वेबसाईट – पहा
अधिकृत जाहिरात – पहा
अर्ज कसा करायचा ?
- सदरची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती होणार आहे ती भरती ती पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
- स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
- स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये लिहायचे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर फॉर्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपीआय पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsap ग्रुप मध्ये सामील व्हा ते हि विनामूल्य.