तलाठी भरतीसाठी तयारी करत आहात पण तुम्हाला माहिती नाही तलाठी भरतीसाठी ची संपूर्ण प्रोसेस आणि कागदपत्रे . खाली दिलेली माहिती वाचा..Talathi Bharti Required Documents, Process

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Talathi Bharti Required Documents – यावर्षीची तलाठी भरती ही सर्वात मोठी तलाठी भरती असणार आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त जागा यावर्षी भरल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते आणि सदरची भरती आता MPSC घेणार की कोणत्या दुसऱ्या माध्यमांमार्फत घेतली जाणार याकडे भरपूर जणांचे लक्ष लागून आहे पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की तलाठी भरतीची सिलेक्शन प्रोसेस कशी असते, तलाठ्याची कामे काय असतात, तलाठ्यांना पगार किती असते तसेच या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे देखील काय काय असतात. तरी सगळी माहिती आपल्याला आता खाली बघायला मिळणार आहे तर सगळी माहिती वाचा, आपल्या मित्र-मैत्रिणींना जे कोणी तलाठी होण्याचं स्वप्न बाळगत आहे त्या सर्वांना ही माहिती शेअर करा. आणि हा खाली आपल्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपला नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा म्हणजेच अशाच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्यापर्यंत येत राहतील.

Talathi Bharti 2026, Talathi Recruitment 2026, Talathi Duties, Expected Date 2026

तलाठी ची नेमकी कामे काय ? तलाठी झाल्यावर काय काय कामे करावी लागतात ? duties of talathi / Responsibilities

  • सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया तलाठी म्हणून तुम्हाला काय काम करायला लागणार आहे किंवा तलाठी म्हणून जर तुम्ही जॉइनिंग झाला तर तुम्हाला या या प्रकारचे काम करायला लागतील तर त्यामध्ये सगळ्यात पहिले असते की तलाठीचा सर्वात पहिली महत्त्वाचं काम की जमिनीच्या नोंदी ठेवणे नंतर तुमचा जमिनीच्या मालकांची माहिती ठेवायची जमीन खरेदी विक्रीच्या नोंदी बघायच्या सातबारा आठ अ उतारा मध्ये नोंदी घ्यायच्या.
  • सोबतच इतर कामांमध्ये पिक विमा योजना असेल शेतकऱ्यांची मदत ची योजना असेल किंवा सरकारकडून जर कोणते अनुदान आले त्या अनुदाना संदर्भातील योजना असतील तर या सगळ्यांचा लेखाजोखा ठेवायचं काम हे तलाठ्याकडे असते.
  • तसेच गावातल्या भरपूर अशा प्रमाणपत्र द्यायचे असतात त्यामध्ये उत्पन्न दाखला रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्रासाठी समजा जमिनीची माहिती द्यायची आहे देवस्थान जमीन आहे किंवा ओबीसी कास्ट मध्ये जे मुस्लिम समाज येतोय त्यांच्या जमिनीच्या नोंदी असतात ज्या त्यांना दर्ग्याकडून वगैरे मिळाले असते तर अशा बेसिक सगळ्या नोंदी ठेवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे माहिती पुढं पुरवणे हे सर्व काम तलाठ्याचे असते.
  • सोबतच जमिनीच्या सीमा असतील तर किंवा त्याच्या सीमान बाबत बाबत काही जरी वाद झाला किंवा काही वेळा जमीन मोजणीसाठी सुद्धा तलाठी मदत करतात अशी बरीचशी काम तलाठी कडे असतात तसेच तलाठी या गावातला सरकारचा प्रतिनिधी मानला जातोय.
  • तलाठी हा खाली दिलेल्या सर्व प्रकारांमध्ये काम करू शकतात
    • जमिनीची माहिती
    • जमीन मालकांची माहिती
    • जमिनीच्या खरेदी विक्रीच्या नोंदी
    • नैसर्गिक आपत्ती
    • पिकांच्या नोंदी
    • कोणत्या क्षेत्रात कोणती पीक घेतली जातात या सगळ्यांचा लेखाजोखा
    • जमीन कर
    • दंड किंवा सरकारी कोणतेही शुल्क असतील तर ते
    • पूर दुष्काळ गारपीट अतिवृष्टी या सर्वांच्या सर्वे पंचनामे
    • सरकारी योजनांच्या अंमलबजावणी
    • शेतकरी मदत योजना
    • पीक योजना
    • प्रधानमंत्री किसान योजना
    • सर्व प्रकारचे दाखले उत्पन्न रहिवासी
    • जातीच्या दाखल्यासाठी जमिनीचे माहिती
    • महसुली नोंदी
    • शेताची माहिती

तलाठी भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रताTalathi Bharti Educational Qualifications

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
  • ज्यांना संगणकाचे ज्ञान, मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे आणि तलाठी भरतीसाठी सरकारची जी परीक्षा असते ती पास करणारे उमेदवार तलाठी म्हणून काम करू शकतात.

तलाठ्यांना पगार किती असतो ? Talathi Salary

  • तसे तर सरकारी नियमानुसार तलाठ्याचा पगार साधारण 25,000 /- रु ते 81,000 /- रु इतका असतो.
  • याशिवाय तलाठ्यांना भरपूर असे भत्ते असतात.
    • त्यामध्ये महागाई भत्ता (DA)
    • घर भाडे असतात (HA)
    • प्रवास भत्ता व शासनाच्या इतर भत्ते सुद्धा असतात.

तलाठी भरती चा परीक्षेचा पॅटर्न (Talathi Bharti Paper Pattern)

  • आपण तलाठी भरती चा अभ्यास करताना परीक्षेचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे की परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ट टेस्ट असते या पद्धतीने ही परीक्षा होते त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता इत्यादी प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात मराठी 25 प्रश्न असतात इंग्रजीमध्ये 25 असे प्रत्येक चारही विषयांमध्ये 25 – 25 प्रश्न असतात आणि प्रत्येकाला दोन गुण असे एकूण 200 गुणांसाठी तलाठी भरतीची परीक्षा होत असते यामध्ये एकूण 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासांचा वेळ दिला जातो आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कांसाठी आपल्याला विचारला जातो.
विषयप्रश्नगुण
मराठी 2550
इंग्रजी2550
सामान्य ज्ञान2550
बौद्धिक क्षमता2550
एकूण100200
  • Talathi Bharti 2026 संदर्भात आपल्या सर्वांना एक अजून एक प्रश्न पडला असेल की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का तर आपल्या सर्वांना मी असे सांगतो की यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे आपण शंभरच्या शंभर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा जेणेकरून आपले स्कोरिंग चांगले होईल आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही

तलाठी परीक्षेचा अभ्यास कसा करावा.

  • आता पदवीधरांना फक्त तलाठी भरती चा पेपर देता येतोय त्याचा अभ्यास करताना आपल्याला पदवीपर्यंत सर्व शिक्षण त्यामध्ये मराठीसाठी आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचा, म्हणी व त्यांचा अर्थ व्याकरण शब्दसंग्रह इत्यादी सर्व प्रकारचे प्रश्न येणार आहेत, तर आपण त्या संदर्भातील अभ्यास करावा अधिक माहितीसाठी आपण पाठीमागच्या काही प्रश्नपत्रिकांचा संदर्भ घेऊ शकता.
  • आता आपण जर इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना काय करायचं असा जर विचार करत असाल तर त्यामध्ये खालील पद्धतीने प्रश्न आपल्याला येतात त्यामध्ये Sentence Correction, Synonyms,Tense,Grammer,Vicabulary येतात आणि ग्रामर येते तर बेसिक ग्रामर आपल्या मजबूत असेल तर आपल्याला यामध्ये देखील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही सोबतच आपल्याला पाठीमागच्या भरतीचे पेपर्स बघून कशा प्रकारचे प्रश्न आलेत कशा प्रकारचे त्याला उत्तर द्यायचेत तर मागच्या काही वर्षातले प्रश्न पत्रिका व त्याचे उत्तर पत्रिका तपासून आपल्याला याचा अभ्यास करता येतोय. मित्रांनो जर सखोल अभ्यास केला खूप माहिती घेऊन अभ्यास केला तर कोणत्याही परीक्षा अवघड नसतात आणि जर तलाठी भरती सारखी परीक्षा अवघड असेल तर यूपीएससी करणाऱ्यांनी काय करायला पाहिजे.
  • आता पुढचा पार्ट येतो तो म्हणजे सामान्य ज्ञान जनरल नॉलेज चा आता याच्या नावाप्रमाणेच आपल्याला जनरली सगळ्या माहिती असतात त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, शासकीय योजना, राज्यघटना, चालू घडामोडी त्यामध्ये बेसिक टिप्स आल्या की आपण जेव्हापासून शाळेमध्ये शिकतो तेव्हापासून चा इतिहास भूगोल तो महाराष्ट्राचा असेल त्यामध्ये शासकीय योजना राज्यघटना चालू बेसिक्स, टिप्स वगैरे सगळ्या आल्या, त्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेजचे एकच पुस्तक आहे. जनरल नॉलेज याच्या पाठीमागे घडलेल्या गोष्टी ह्या कॉन्स्टंट राहत असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही तर तुम्हाला ते एकदम मजबूत पक्क करून घ्यायचं त्याच्यानंतर इथून पुढे जे घडणार आहे. त्याच्यासाठी रोजचा तुमचा अभ्यास चालू असायला पाहिजे. रोज करंट अफेअर्स वाचा महाराष्ट्रचा स्पेशली जनरल नॉलेज वाचा की ज्या गोष्टी कधीच बदलणार नाही आहेत सरकारी योजना असतील तर त्यांची माहिती घ्या त्याची माहिती ठेवा. त्यामध्ये लागणाऱ्या डिटेल्स शोधा आणि हा विषय खूप महत्त्वाचा असल्याने आपल्याला यामध्ये थोडा जास्त फोकस देऊन अभ्यास करायचा आहे.
  • आता सर्वात शेवटचा विषय आला तो म्हणजे बौद्धिक क्षमता रीजनिंग तर त्यामध्ये आपल्याला संख्या मालिका दिशा चाचणी त्यासाठी नातेसंबंध साम्य शोधणे समानता शोधणे, संकेत लेखन किंवा संकेत उलगडणे या सोबतच आकडेवारी या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या बौद्धिक क्षमतांना विचारात घेऊन विचारलेले असतात आणि यामध्ये आपल्याला शॉर्ट ट्रिक्स वापरून टाईम मॅनेजमेंट करून हे 25 प्रश्न सोडवता आले पाहिजेत हे प्रत्येकाच्या स्किल्स वरती असते. तलाठी भरतीचा अभ्यास करताना प्रत्येक जण आपापल्या टेक्निकने परीक्षा देत असतोय आपल्याला जे येतोय नेमकं त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा सोडवून घेणे, आणि त्यानंतर ज्या गोष्टी येत नाहीत त्या गोष्टींना वेळ देणे हे खूप चांगलं आणि महत्त्वाचं तंत्र आहे ज्यामध्ये आपण तलाठी होऊ शकता.

तलाठी परीक्षा देत असताना लक्षात ठेवण्यासारखे टिप्स – Talathi Bharti 2026 Tips

  • आपण जर पहिल्यांदा परीक्षा देत असाल आणि आपल्याला परीक्षेचा पॅटर्न माहिती सीबीटी म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट असते आपण कधीच दिली नसेल तर सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की मागच्या पाच वर्षांमध्ये जे पण आपल्याला तलाठी भरती चे पेपर्स मिळतील तर ते पेपर सोडवणे यामुळे तुम्हाला पेपर मधील प्रश्नांचा पॅटर्न समजणार आहे.
  • जर तुम्हाला शक्य असेल तर रोजच्या रोज मॉक टेस्ट द्या मॉक टेस्टिंग डेमो टेस्ट असते पण तुम्हाला त्याच्यामध्ये टाईम लावून प्रश्नांची उत्तर द्यायचे असतात त्यामध्ये तुम्हाला तुमचं टाईम मॅनेजमेंट समजेल कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे हे समजेल तसेच आणखीन बऱ्याचशा गोष्टींमध्ये मॉक टेस्ट आपल्याला लाभकारक आहे तर तुम्हाला जर तुमचा स्पीड वाढवायचा असेल आणि तुम्हाला तुमच्या दोन तासाच्या टाईम मध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे असतील आणि त्यासाठी जर तुम्हाला तुमची गुणवत्ता तुम्हाला तुमची पात्रता चेक करायचे असेल तर मॉक टेस्ट हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पर्याय आहे तर ते तुम्ही द्यावी.
  • दोनच तासांचा वेळ आणि शंभर प्रश्न सोडवायचेत तर ते 100 प्रश्न तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून प्रॉपर सोडवायला लागणार आहेत दोन तासात 100 प्रश्न सोडवायचे असल्यामुळे तुमचा टाईम मॅनेजमेंट खूप चांगलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे मॉक टेस्ट द्यायचे मॉक टेस्ट दिल्यानंतर तुम्ही तुमच्या टाईम मॅनेजमेंट वरती फायनल राहाल तुम्हाला शंभर प्रश्न दोन तासांमध्ये कव्हर होतील.

या वर्षीच्या तलाठी भरतीच्या तारखाTalathi Bharti 2026 Dates

  • यावर्षी साठी सरकारकडून अजून पर्यंत तर कोणतीही अधिकृत अशी तारीख खालील नाही पण तलाठी भरती एमपीएससी मार्फत करायची की बाहेरच्या कोणत्या एजन्सी मार्फत याबद्दल सरकारमध्ये याचा अभ्यास सुरू आहे तर लवकरात लवकर आपल्याला या संदर्भातील सर्व अपडेट्स मिळतील या अपडेट्स आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा.

तलाठी भरतीची अधिकृत वेबसाईटपहा

 तलाठी भरती संदर्भातील प्रश्नपत्रिका तसेच सर्वात महत्त्वाची माहिती तलाठी भरती चा अभ्यास कसा करावा त्याचे सिल्याबस त्याच्यासाठीची चांगली पुस्तक ज्याच्यामध्ये मराठी, जनरल नॉलेज, रिजनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी असतील तर ती तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर आताच आपल्या वरील लिंकवर क्लिक करून नोकरीबघा चा Whattsapp ग्रुप जॉईन करा.

खाली दिलेल्या पुस्तकामध्ये जवळपास 150 + प्रश्नपत्रिका दिल्या आहेत. पुस्तक घरी मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Talathi Bharti

Leave a Comment