Talathi Bharti 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती चालू होणार आहे. या भरतीमध्ये 4644 पेक्षा जास्त ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी यांची भरती केली जाणार आहे. आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर चालू होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या पदावर ती नवीन भरती झाली नसल्याने 2026 ची ही सर्वात मोठी भरती असणाऱ आहे. आपल्याला देखील या भरतीची सर्व माहिती जाणून घ्यायची असल्यास खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला ॲड व्हा.
Talathi Bharti 2026, Talathi Bharti 2026 Dates
पदाचे नाव – ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)
एकूण पदसंख्या – 4644 पदे (अंदाजे)
पात्रता – Talathi Bharti Details 2026
- उमेदवारांनी कोणत्याही शासन मान्य विद्यापीठामधून पदवी (Graduation) प्राप्त केलेली असावी.
- संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण MSCIT किवा संगणकाशी संबंधित कोणताही कोर्स केलेला असावा किवा नियुक्तीनंतर च्या 02 वर्षांमध्ये तो पूर्ण करणे अनिवार्य असेल.
- मराठी भाषा सक्ती असेल आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- वयाची अट – 18 ते 38 वर्षांपर्यंत असेल (अनुसूचित जाती / जमाती न त्यांचे आरक्षण व सुट मिळेल.)
पगार – Talathi Salary & Benefits
- तलाठी या पदासाठी ग्रेड 8 – 25,000 – 81,000 रु इतका पगार व इतर भत्ते असे पगाराचे स्ट्रक्चर आहे.
- हि भरती राज्य शासनाच्या (State Government Jobs) नोकरीच्या मध्ये एक स्थिर असा करियर चा पर्याय आहे. ज्यामध्ये नोकरीची हमी आणि बदली चे फायदे सुद्धा मिळतात.
तलाठ्यांचे काम काय असते ?
- गावातील जमिनीच्या नोंदी ठेवणे 7/12, इतर हक्क, फेरफार इत्यादींची माहिती घेणे व त्या नोंदी घेणे.
- पूर, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती इत्यादी आल्यानंतर त्या संबंधित सर्व माहिती शासनाकडे सुपूर्त करणे त्याचे सर्वे करणे.
- सरकारी योजना व शासकीय अनुदानांची माहिती शासनामार्फत घेऊन लोकांना देणे पिकांची आणेवारी लावणे विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी तपशीलवार तयार करणे ते दाखले देणे
Talathi Bharti Exam Syllabus
- परीक्षा TCS मार्फत किवा MPSC मार्फत होण्याची शक्यता आहे.
- यामध्ये 100 प्रश्न आणि – 200 मार्कचा पेपर असणार आहे. (प्रयेक प्रश्न = 02 गुण)
- वेळ – 02 तास आणि यामध्ये कोणत्याही प्रकरचे Negetive Marking Scheme नाही आहे.
- Exam Syllabus मध्ये General Knowledge,English Language, Marathi Language, Reasoning असतील.
Talathi Bharti 2026 Application Process
- सदर भरतीचा फॉर्म चालू झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- फॉर्म भरताना सोबत आपल्याला सर्व महत्वाची कागदपत्रे व त्यावरील माहिती भरायची आहे. सोबतच हि सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
- कागदपत्रे अपलोड करताना आपल्याला योग्य त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत ही सर्व साईज त्याची साईज ही सगळी माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- त्यानंतर या भरतीसाठी निश्चित केलेली फी भरायची आहे ती आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यापैकी कोणत्याही एका माध्यमातून भरू शकता फी भरून झाल्यानंतर आपल्याला ते फी भरलेली पावतीची रिसीट डाऊनलोड करून किंवा प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे तसेच आपण भरलेल्या फॉर्म देखील आपल्याजवळ ठेवायचा आहे
Talathi Bharti 2026 Selection Process
- तलाठी भरतीसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला CBT (Computer Based Test) द्यायचे आहे.
- त्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपण आपले जर सिलेक्शन झाले असेल तर त्याच्यानंतर Documets Verification म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर आपल्याला तलाठी म्हणून नोकरी मिळेल.
सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तलाठी भरतीची प्रक्रिया ही कधीही सुरू होऊ शकते यामध्ये बऱ्याचशा पेपर त्यानंतर न्यूज यामध्ये या गोष्टीची माहिती आपल्याला मिळून जाईल पण त्यापेक्षाही लवकर जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप चा ग्रुप किंवा आपल्या टेलिग्राम चा चैनल जॉईन करून घ्या जेणेकरून भरतीची प्रक्रिया चालू झाल्यानंतर ताबडतोब आपल्याला त्यासाठी लागणारी कागदपत्रे व इतर सर्व तत्सम बाबी आपल्या मोबाईल वरती माहिती स्वरूपामध्ये मिळतील.
तलाठी भरती अधिकृत वेबसाईट – पहा
तलाठी भरतीसाठी कोण कोणते विषय असतात ?
सामान्य ज्ञान, मराठी , इंग्रजी व्याकरण व बौद्धिक चाचणी हे विषय असतात.
2026 साठी ची तलाठी भरती कधी असणार आहे ?
तलाठी भरतीची अजून कोणतीही तारीख अधिकृत रित्या आलेली नाही आहे.
तलाठी भरतीसाठी MSCIT अनिवार्य आहे का ?
नाही. असेल तर आपण जोडू शकता. नसेल तर आपल्याला रुजू झाल्यानंतर २ वर्षांपर्यंत कधी पण करू शकता.
तलाठी भरती झाल्यानंतर पगार किती मिळतो ?
अंदाजे 40,000 ते 80,000 रु प्रती महिना इतका पगार तलाठी ला मिळतो. त्यामध्ये घर भाडे, महागाई भत्ता समाविष्ट असतो.