Lek Ladki Yojana Maharashtra In Marathi
Lek Ladki Yojana 2024
Lek Ladki Yojana Age Limit, Lek Ladki Yojana Form,
लेक लाडकी योजना In Marathi – नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहेत की मुलीचे जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवायचा त्यानंतर कुपोषण कमी करणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, आणि मुलींचा मृत्यूदर कमी करून बालविवाह रोखणे, तर या उद्दिष्टांना समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना सुरू करणे साठी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी“ ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी कार्ड रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येतील. अशी घोषणा महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. त्याच त्याच अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती.
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे.
Table of Contents
उद्दिष्ट्ये –
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- कुपोषण कमी करणे.
लाभ ( फायदे ) – Lek Ladki Yojana Benefits
- मुलीच्या जन्मानंतर ५००० /-
- इयत्ता पहिली 6000 /-
- सहावीत ७००० /-
- अकरावीत ८०००/-
- लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75००० /-
असे एकूण 1.0 /- रु एवढी रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजना अटी व शर्ती – ( Terms & Conditions )
- ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
- एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
- तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञ राहील मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीच किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुत्नीय राहील माता-पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाख पेक्षा जास्त नसावे.
Lek Ladk Yojna Apply Online – Click here
आवश्यक कागदपत्रे –
- लाभार्थीचा जन्माचा दाखला.
- कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, याबाबत तहसीलदार सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- लाभार्थीच्या आधार कार्ड पालकांच्या आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- रेशन कार्ड (पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला.
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत शाळा संबंधित शाळेच्या दाखला (BONAFIED)
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथील अटी शर्तीमध्ये याबाबत तहसीलदार /सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
- येथील अटीनुसार अंतिम लाभ करता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील, अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती
Lek ladaki yojana Apply online –
सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन भरून घ्यावा. या साठी सरकार कोणतीही वेब साईट किवा लिंक उपलब्ध नाही आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांच्याकडे तो जमा करावा. सदर लाभार्थ्याने सर्व कागदपत्रे व माहिती ऑनलाईन अपलोड करावी.
खाली दिलेल्या लिंक वरून pdf फाईल ची प्रिंट काढून तो फॉर्म भरून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे जमा करावा.
Lek Ladki Yojana Form
दिनांक 01 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 राहील तदनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Lek Ladki Age Limit (वयाची अट) – 18 Years
- IOCL Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये 246 जागांसाठी भरती
- Konkan Mahakosh Bharti 2025 : कोकण विभाग मध्ये लेखा आणि कोषागार विभाग मध्ये 179 पदांसाठी भरती
- Central Bank Bharti 2025 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी नोकरीची संधी
- AIC Bharti 2025 : 2025 मध्ये AIC Bharti! कृषी विमा क्षेत्रात 55 MT जागा उपलब्ध – अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ!
- SECL Bharti 2025 : १० वि पास उमेदवारांना नोकरीची संधी…. साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 900 जागांसाठी नोकरीची संधी