High Explosive Factory Khadki Bharti 2026 – बघा तुम्ही देखील दहावी पास आहात आणि सोबतच फिटर, इलेक्ट्रिशन, एअर कंडिशनर रिपेरिंग वगैरे या मधला कोणत्याही प्रकारचा आयटीआय कोर्स जर केला असेल तर तुमच्यासाठी एक नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. यामध्ये आपल्याला सरकारच्या High Explosive Factory Khadki म्हणजेच स्फोटके तयार करण्याच्या फॅक्टरीमध्ये सुपरवायझरी स्टाफ किंवा स्किल वर्कर म्हणून नोकरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी वयाची अट, शैक्षणिक पात्रता, पगार इत्यादी सर्व माहिती खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तुम्ही पण जर या प्रकारच्या नोकरी करण्यात रुची ठेवत असाल तर लवकरच खाली लिंक वर क्लिक करा. आणि अर्ज डाऊनलोड करून तो भरून वरील पत्त्यावर पाठवा.
High Explosive Factory Khadki Bharti 2026, Khadki Jobs 2026, Superwisor Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | सुपरवाइजरी स्टाफ |
| एकूण पदसंख्या | 91 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
| नोकरीचे ठिकाण | खडकी (पुणे) |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 91 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सुपरवाइजरी स्टाफ | 06 |
| 2 | स्किल्ड वर्कर | 85 |
| एकूण | 91 |
शैक्षणिक पात्रता (High Explosive Factory Khadki Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) B.E/b.Tech (Chemical) ii) माझी पदवीधर शिकाऊ उमेदवार ज्यांनी एम आय एल अंतर्गत ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये किंवा लष्करी दारूगोळा बनवणारे कंपनी मध्ये स्फोटके तयार करणाऱ्या ऑर्डिनन्स कंपनी अप्रेंटिस शिप केली आहे. किंवा त्या ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचे प्रशिक्षण घेतलं आहे. आणि ज्या व्यक्तींना दारूगोळा आणि स्फोटके तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये एक वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव असेल, तर त्यांना पदवीधर प्रकल्प अभियंता म्हणजेच ग्रॅज्युएट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नियुक्त केले जाईल.
- पद क्र 2 – i) 10 वी पास ii) NCVT Aocp Metal worker Sheet metal worker, General Machinist, Turner, Electrician, Electronic mechanic, Boiler attendant, Refrigeration and air conditioning mechanic, PPO, Fitter Mechanic industrial electronics, Etc.

वयाची अट – नमूद नाही आहे. (कृपया जाहिरात पहा)
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – खडकी (पुणे)
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The chief general manager high explosive factory Khadki Pune 411003 Maharashtra
महत्वाच्या तारखा (High Explosive Factory Khadki Bharti 2026 important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 21 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (High Explosive Factory Khadki Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- मित्रांनो सदरची भरती ही आपल्याला थोडी कॉम्प्लिकेटेड वाटेल थोडी अवघड वाटेल कारण यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये आपल्याला आयटीआय किंवा दहावी पास बारावी पास असे दिलेले पण जर आपल्या जवळ अस्फोटके तयार करण्याच्या फॅक्टरी मधला अनुभव असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तिथे घेतलं जाणार आहे.
- अप्रेंटिसचा जरी अनुभव असेल तरी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तिथे घेतलं जाईल त्यामुळे या भरतीचा फॉर्म भरताना एकदा आपण जाहिरात जरूर बघावी आणि त्यानंतरच या भरतीचा ऑफलाइन फॉर्म भरावा. फॉर्मची प्रिंट आपल्याला जाहिरातीमध्येच मिळून जाईल शेवटच्या दोन पानं हे अर्जाचे असणारे त्यामध्ये पेनाने आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि वरती दिलेल्या पत्त्यावरती हा फॉर्म पाठवायचा आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती आपल्या अनुभव शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती योग्य व्यवस्थित भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. फॉर्म भरताना आपल्याला विचारलेल्या सर्व ईमेल आयडी मोबाईल नंबर हे चालू आणि सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून नंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकेल.
- या भरतीसाठी चा अर्ज भरताना आपल्याजवळ जर अनुभव असेल तर लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरा कारण आपल्या अनुभवावरती आपल्याला सर्वात फास्ट नोकरी मिळू शकते. आणि जर आपल्या जवळ अनुभव नसेल पण आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींना या भरतीसाठी ची माहिती शेअर करायची आहे. जेणेकरून त्यांना देखील या भरतीचा अर्ज भरता येईल.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती मिळेल