NHAI Bharti 2025 – पदवी शिक्षण झालेल आहे. एमबीए झालंय किंवा टायपिंग लघुलेखन झालं तर तुम्हा सगळ्यांसाठी ही नोकरीची संधी आलेली आहे. अकाउंटंट, स्टेनोग्राफर, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर आणि डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी भरतीच्या अर्ज सुरू झालेत. नॅशनल हायवे ऑथॉरिटी म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये 84 जागांसाठी ही नोकरी निघालेली आहे. 18 ते 30 वर्षाचे कोणीही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर लवकरात लवकर अर्ज करा 15 डिसेंबर 2025 ही अर्जाची शेवटची तारीख आहे आणि या भरतीसाठी अर्ज करा.
NHAI Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण जागा – 84
Table of Contents
भरतीबद्दल थोडक्यात –
| पदाचे नाव | अकाऊंटट,स्टेनोग्राफर व आणखीन |
| एकूण पदसंख्या | 84 |
| शैक्षणीक पात्रता | पडला अनुसरून |
| वयाची अट | 18 ते 30 वर्षे |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2025 |
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर | 09 |
| 2 | लायब्ररी अँड इन्फोर्मेशन असिस्टंट | 01 |
| 3 | ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर | 01 |
| 4 | अकाऊंटट | 42 |
| 5 | स्टेनोग्राफर | 31 |
| एकूण | 84 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – MBA (Finance)
- पद क्र 2 – लायब्ररी सायन्स पदवी
- पद क्र 3 – i) इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) ट्रान्सलेशन डिप्लोमा किवा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 – i) पदवीधर ii) CA/ CMA
- पद क्र 5 – i) पदवीधर ii) लघुलेखन (इंग्रजी किवा हिंदी) मध्ये प्रती मिनिट 80 शब्दांच्या वेगाने 05 मिनिटे श्रुत लेखन आणि ट्रान्सस्क्रीप्शन वेळ इंग्रजी 50 मिनिटे किवा हिंदीसाठी 65 मिनिटे असणार आहे. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)
वयाची अट – 15 डिसेंबर 2025 रोजी (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सुट )
- पद क्र 1 ते 4 – 18 ते 30 वर्षे
- पद क्र 5 – 18 ते 28 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC/EWS – 500 / –
- SC/ST/PWD – फी नाही
पगार –

अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (NHAI Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 ऑक्टोंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 15 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
असा करा अर्ज ?
- NHAI Bharti 2025 या भरतीचा अर्ज भरताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे किंवा शेजारील लिंक वर क्लिक करून आपण या भरतीचा अर्ज भरायला सुरुवात करू शकता.
- न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म नव्याने भरायला घेऊ शकता सदरचा फॉर्म भरताना आपल्याला आपली शैक्षणिक कागदपत्रे आपला रहिवासी दाखला जातीचा दाखला इथेच सर्व कागदपत्रांच्या हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी आपल्याजवळ असल्या पाहिजेत कारण फॉर्म भरताना तुम्हाला त्या अपलोड करावे लागणार आहेत.
- फॉर्म भरताना फॉर्म अचूक व्यवस्थित भरावा जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज बाद करण्यात येणार नाही फॉर्म भरून झाल्यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईजमध्ये पीडीएफ, जेपीजी या फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.
- NHAI Bharti 2025 फॉर्म सबमिट करावा फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला फी भरण्यासाठी प्रोसेस करायचे आहे इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी पैकी कोणत्याही एका माध्यमाद्वारे आपण या भरतीसाठीची फी भरू शकता.
- ती भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्याजवळ पोहोच म्हणून ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र वगैरे महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या रिसीट चा उपयोग करता येईल.
- अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक अडचणीसाठी 95 13 25 20 99 या क्रमांकावर ती संपर्क साधावा आणि आपल्याला आलेली कोणत्याही प्रकारची अडचण या हेल्प डेस्कद्वारे सोडवली जाईल.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवा.