PMC Teacher Bharti 2025 – PMC टीचर भरती साठी चा फॉर्म निघालेला आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) या पदासाठी आपल्याला जवळपास 284 जागांची भरती करायची आहे. यामध्ये आपले जर शिक्षण डीएड किंवा बीएड झाला असेल, दोन्ही साठी मराठ्यांनी इंग्रजी माध्यम हे असणार आहे. तर आपण 20,000 रुपये प्रति महिना इतक्या पगाराची नोकरी फक्त पुण्यामध्ये बसून मिळवू शकता अर्ज हे पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला खालील जाहिरातीमधून अर्ज घेऊन तो भरून संबंधित पत्त्यावरती सादर करायचा आहे.
PMC Teacher Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 284 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | 213 |
2 | प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | 71 |
एकूण | 284 |
PMC Teacher Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – D.ED / B.ED (मराठी माध्यम)
- पद क्र 2 -D.ED / B.ED (इंग्रजी माध्यम)
वयाची अट – 22 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – पुणे
फी -General/OBC/EWS – 1000 /- [SC/ST/PWD – 250 /- रु ]
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिक्षण विभाग प्राथमिक,पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे 05
पगार -20,000 /- रु प्रती महिना (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
PMC Teacher Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 24 जुलै 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 29 जुलै 2025 |
PMC Teacher Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- सदर भरतीचा अर्ज पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने भरायचा असल्याने आपल्याला सर्व प्रथम जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- त्यानंतर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटच्या म्हणजेच तीन आणि चार नंबरच्या पानावरती जो अर्ज दिलेला आहे तो अर्ज आपल्याला प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती पेनाने भरायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला वरती दिलेल्या चौकोन बॉक्स मध्ये आपला फोटो लावून अर्ज पुन्हा एकदा चेक करून अर्ज सोबत विचारलेली सर्व कागदपत्रे झेरॉक्स तसेच साक्षांकित करून आपल्याला वरती दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत.
- अर्ज हे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपण दिलेली माहिती व आपण लिहिलेली माहिती यामध्ये आपण एकदा चेक करून मगच हा अर्ज पुढील पत्त्यावरती पाठवावा जेणेकरून नंतर फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व किरकोळ कोणत्याही कारणासाठी आपला अर्ज बाद केला जाणार नाही.
- संपूर्ण मराठीमध्ये व सुस्पष्ट असे सर्व माहिती लिहावी तसेच आपला व्यवस्थित असा आयडेंटी साईज फोटो वरती दिलेल्या बॉक्समध्ये चिटकवावा.
- अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
- आणि यानंतरची सगळी माहिती तुम्हाला तुमच्या ईमेल व तुमच्या मोबाईल वरती मिळेल त्यानंतर तुमचे या नोकरी संदर्भातील डॉक्युमेंट वेरिफिकेशन व इतर सर्व प्रोसेस होईल तर आपण जो ईमेल आयडी व मोबाईल नंबर देणार आहात तो व्यवस्थित व सुस्थितीत असलेल्या द्यावा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.