MJP Bharti 2025 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये 290 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MJP Bharti 2025 – फक्त दहावी बारावी पदवी किंवा डिप्लोमा झाला असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. 56 हजार ते एक लाख 77 हजार रुपये इतका पगार आपल्याला असणार आहे लेखापरीक्षण लेखा अधिकारी सहाय्यक लेखा अधिकारी लघुलेखक कनिष्ठ लिपिक तसेच सहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते लवकरात लवकर अर्ज करा आणि या भरतीचा फॉर्म भरा. MJP Recruitment 2025

MJP Bharti 2025

थोडक्यात

पदाचे नावगट अ,ब,क
पदसंख्या290
अर्ज चालू झालेली तारीख20 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख19 डिसेंबर 2025
पगार 56,000 – 1,77,500 /- रु प्रती महिना

जाहिरात क्र – एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३

एकूण पदसंख्या – 290

पदाचे नाव व तपशील (MJP Bharti 2025 Post Name & Details)

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1लेखा परीक्षण अधिकारी / वरिष्ठ लेखा अधिकारी गट ब02
2लेखा अधिकारी (गट ब)03
3सहाय्यक लेखा अधिकारी (गट ब)06
4उप लेखापाल (गट क)03
5कनिष्ट अभियंता
(स्थापत्य)
144
6कनिष्ट अभियंता
(यांत्रिकी)
16
7उच्चश्रेणी लघुलेखक03
8निम्नश्रेणी लघुलेखक06
9कनिष्ट लिपिक/ लिपिक नि टंकलेखक46
10सहाय्यक भांडारपाल13
11स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक48
एकूण290

शैक्षणिक पात्रता (MJP Bharti 2025 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) B.Com किवा समतुल्य कोर्स ii) 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) M.Com किवा समतुल्य कोर्स आवश्यक ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) B.Com
  • पद क्र 4 – i) B.Com
  • पद क्र 5 – i) सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी / डीप्लोमा
  • पद क्र 6 – i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन टेक्नोलॉजी इंजिनियरिंग
  • पद क्र 7 – i) 10 वी पास ii) लघुलेखन 120 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्रा.मी
  • पद क्र 8 – i) 10 वी पास ii) लघुलेखन 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्रा.मी
  • पद क्र 9 – i) पदवीधर ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्रा.मी
  • पद क्र 10 – i) 10 वी पास ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्रा.मी
  • पद क्र 11 – i) 10 वी पास ii) सिव्हील इंजिनियरिंग डिप्लोमा/ पदवी

वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी (मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट)

  • पद क्र 1 – 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 ते 11 – 18 ते 38 वर्षे

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- रु [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग – 900 /- रु ]

पगार – 56,000 – 1,77,500 /- रु प्रती महिना (पदाला अनुसरून)

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा (MJP Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख20 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख19 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या एक आठवदां अगोदर

महत्वाच्या लिंक्स (MJP Bharti 2025 Important Links)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात वाचणे गरजेचे यासाठी की जाहिरातीमध्ये आपल्याला संपूर्ण पदाची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पदाचे नाव तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती मिळून जाईल.
  • जाहिरात वाचण्यासाठी वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपण देखील या भरतीचा जाहिरात वाचू शकता जाहिराती पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे त्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळून जाईल
  • त्यानंतर वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करताना अर्ज हे संपूर्णपणे आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे स्कॅन करून जोडायची गरज नाही आहे.
  • आपलं फक्त आपला फोटो सही डिक्लेरेशन आणि डाव्या हाताचा अंगठा या गोष्टी स्कॅन करून जोडायच्या आहेत.
  • तसेच या सगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला विचारलेले सर्व माहिती खरी व बरोबर लिहायची आहे.
  • सर्व माहिती लिहून झाल्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रता त्यामध्ये आपल्याला मिळालेले गुण तसेच गुणांची टक्केवारी प्रमाणपत्रावरील तारीख इत्यादी सर्व माहिती बरोबर वाचून टाकायचे आहे.
  • यानंतर आपल्याला फोटो सही डिक्लेरेशन या सर्व गोष्टी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची मागणी आपल्याकडून केली नसेल.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर या फॉर्मसाठीची जी फी आहे ती आपल्याला ऑनलाईन इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादीच्या माध्यमातून भरायचे आहे.
  • तसेच फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेल्या फॉर्मची पर्यंत काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करताना आपल्याला या फॉर्मची गरज पडेल त्यासोबतच याचा युजर आयडीने पासवर्ड हा आपण तयार करत नसल्यामुळे तो आपल्याला डायरेक्ट IBPS मार्फत आपले ई-मेल आयडी वरती किंवा मोबाईल नंबर वरती येतो तो देखील जपून ठेवायचा आहे.

या भरतीच्या सर्व अतिरिक्त माहितीसाठी आपण Nokaribagha.com या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता

Leave a Comment