MHT CET Admit Card Download : एमसीए परीक्षेसाठी काही दिवसांपूर्वी फॉर्म भरनेत आले होते. त्यासाठी आता 23 तारखेपासून परीक्षा सुरु होत आहेत. या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र आज रोजी पासून मिळणे चालू झाले आहे. खालील पद्धतीचा अवलंब करून आपण देखील आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
MHT CET Admit Card Download, CET Hall Ticket Download

प्रवेशपत्र | डाउनलोड करा |
परीक्षेची तारीख | 23 मार्च 2025 पासून पुढे |
- वरती दिलेल्या डाउनलोड करा या पर्यायावर क्लिक करून आपण सर्वप्रथम या मेन पानावरती यायचे आहेत.

- वरती दिलेल्या पर्यायांमध्ये CET EXAMINATION PORTAL FOR A.Y 2025 – 26 या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

- वरती दिलेल्या पर्याय वरती क्लिक करून आपल्याला आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेल्या ई-मेल आयडी व पासवर्ड टाकून Sign In या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

- वरती दिल्याप्रमाणे आपल्याला वरून तीन नंबरचा Hall Ticket or Admit Card या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

- वरती फोटोमध्ये बघितल्याप्रमाणे आपण जेव्हा MHT CET 2025 असा ऑप्शन वर क्लिक कराल तेव्हा तिथं खाली Get Hall Ticket हा ऑप्शन इनेबल झाला असला पाहिजे. तरच आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येते.

- वरील प्रमाणे बॉक्स ओपन झाल्यानंतर आपल्याला Application Number दिसेल त्यानंतर आपले नाव दिसेल व डाउनलोडच्या ऑप्शन खाली आपल्याला एक छोटासा बाण दिसेल. आपले नाव, एप्लीकेशन नंबर चेक करून आपल्याला डाउनलोड दिलेल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व त्या फॉर्मच्या कलर प्रिंट काढायचे आहेत व त्यासोबतच आपला एखादा आयडेंटी प्रूफ घेऊन मग आपण हा पेपर द्यायचा आहे.