Ladki Bahin Yojana Kyc – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहेत, अशी ही योजना आणि या योजनेमध्ये आता केवायसी साठी खूप मोठी अपडेट आली होती. जर आपली केवायसी नसेल तर आपल्याला पैसे देखील मिळणार नाहीत, असं सुद्धा समाज माध्यमांद्वारे सांगण्यात आलं होतं. त्याची शेवट तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती. ती आता 31 डिसेंबर 2025 केली आहे. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ज्या महिलांना पती नाही आहे म्हणजे ते वारलेत किंवा त्यांचा Divorce झाले किंवा ते सेपरेट राहतात.
Ladki Bahin Yojana Kyc
- तर अशा महिलांनी केवायसी कशी करायची केव्हाची करण्यासाठी दुसरा कोणता पर्याय उपलब्ध नव्हता. पण आत्ताच आदिती तटकरे यांच्या ट्विटरवरून एक जीआर आणि एक मेसेज असा आलाय की आता या महिलांची केवायसी आपण खालील पद्धतीने करू शकतो जर महिलेचा पती वारला असेल तर त्यांना मृत्यू दाखला लागेल.
- तसेच जर ते वेगळे राहत असतील तर त्यासाठीची कागदपत्रे म्हणजेच त्यांचे सोडचिठ्ठी डिवोर्स अशा कोणत्याही कागदपत्रांचा वापर करून ती महिला केवायसी करू शकते व आपल्याला मिळणारे पंधराशे रुपये इथून पुढे अविरतपणे मिळू शकते
- तर खाली दिलेली सोपी पद्धत वापरायचे आणि आपण केवायसी करायचे आहे हे केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे त्याशिवाय आपली केवायसी होणार नाही.
- सोबतच आपल्या जवळ पतीच्या कागदपत्रांचा देखील ओरिजनल पुरावा असणे आवश्यक आहे जर नसेल तर आपण तो काढून घ्यावा आणि खाली दिलेल्या सोप्या पद्धतीचा अवलंब करून केवायसी करावी.

आता आपण खाली दिलेल्या प्रोसेस फोलो करून लाडकी बहिण योजनेची KYC करू शकता.
KYC Kashi Karavi ?
- Ladki Bahin Yojana Kyc करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम या https://ladakibahin.maharashtra.gov.in/ लिंक वर क्लिक करायचे आहे.
- वरील लिंकवर क्लिक करून आपण खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर येता.

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे. या पर्यायावर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकता.

- Mazi Ladki Bahin Yojana ची KYC करण्यासाठी वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण लाभार्थी आधार संख्या मध्ये आपला आधार कार्ड चा क्रमांक टाकू शकता. त्याच्या खाली CAPTCHA कोड टाकायचा आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करा.
- 6 अंकी आधार कार्ड चा OTP आपल्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर येईल तो OTP टाकून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा.
- आता हि झाली नॉर्मल KYC करण्याची पद्धत या नंतर आपल्या पतीचे आधार कार्ड नंबर किवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकून त्यांचा देखील OTP टाकायचा. पण ज्यां महिलांचे पती हयात नसतील अथवा सोबत राहत नसतील त्या महिलांनी फक्त इथेपर्यंत च प्रोसेस करायची आहे. Ladki Bahin Yojana KYC
- त्यानंतर आपल्या पतीचा मृत्यू दाखला अथवा सोडचिठी (Divorce) ची प्रिंट घेऊन आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका अथवा आशा वर्कर्स यांच्याकडे ती प्रिंट द्यावी.
- त्यानंतर आपली KYC होऊन जाईल.
- व आपली लाडकी बहिण योजना KYC न झाल्यामुळे बंद पडणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या नोकरीबघा च्या ग्रुप मध्ये सामील व्हा व अशीच नवनवीन अपडेट्स रोजच्या रोज मिळवा.
विधवा निराधार महिला सोडून बाकीच्यांनी अशी करा KYC – क्लिक करा