Ladki Bahin Ekyc Process – लवकरात लवकर करा KYC नाहीतर पैसे होणार बंद

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Ladki Bahin Ekyc Process – महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या Ladki bahin yojana माझी लाडकी बहिणी या योजनेचे दरमहा 1500 /- रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत. पण यामध्ये काही बहिणी या सरकारच्या पात्रता व निकष यादीच्या बाहेर जातात त्यामध्ये आयकर कर भरणे, स्वतःच्या किंवा घरच्यांच्या नावावरती चार चाकी वाहन असणे अशा बऱ्याचशा नियम व अटी या लाडक्या बहिणीकडून तंतोतंत पालन होत नसल्याचे लक्षात येतात सरकारकडून KYC ही अशी एक ऑनलाईन सिस्टीम सुरू करण्यात आलेली आहे. खाली दिलेली माहिती वाचा आणि आपण देखील आपली EKYC करून घ्या जेणेकरून यानंतरचे मिळणारे सर्वच्या सर्व हप्ते आपल्याला दरमहा आपल्या खात्यावरती मिळत राहतील कोणत्याही कारणास्तव हे पैसे बंद होणार नाहीत.

Ladki Bahin Ekyc Process

खाली दिलेल्या काही मोजक्या स्टेप्सचा अवलंब करून आपण लाडकी बहीण योजना या योजनेसाठीची केवायसी करू शकता.

Ladki Bahin Ekyc Date

Ladki Bahin Ekyc Process या लाडकी बहीण योजनेची ही केवायसी करण्यासाठी कोणतेही शेवट तारीख सरकारकडून अद्याप जाहीर झालेली नाही आहे कारण आपण केवायसी करताना बऱ्याचशा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागत आहे काही काही कंडिशन्स मध्ये आपल्याला ओटीपी येत नाही आहे जर लाभार्थीच्या आधार लिंक नंबर वर ओटीपी आला तर त्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येत नाही त्यामुळे ही सिस्टीम सध्या सरकारकडे कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे या योजनेच्या केवायसी साठी सरकारकडून कोणतेही शेवट तारीख अद्याप दिलेली नाही आहे. आणि जर त्या संदर्भातील कोणती शेवट तारीख आली तर आपल्याला ती पेपर डिक्लेअर होऊन मिळेल. कोणीही घाई गडबडीमध्ये याबाबतीत केवायसी करण्याची गडबड करू नये वेबसाईट व्यवस्थित सुरू झाल्यानंतरच या केवायसी ची प्रोसेस करावी. Ladki Bahin Ekyc Last Date

सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली EKYC या पर्यायावर क्लिक करून आपल्याला केवायसी च्या मेन पानावरती यायचे आहे.

Ladaki Bahin Ekyc Link

अशी करा EKYC

  • खाली दिल्याप्रमाणे आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या EKYC पर्याय दिसेल यामध्ये आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक असे दिलेला आहे त्यामध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा त्याच्याखाली कॅपच्या दिलेला आहे, तो टाकून आपण आधार प्रमाणे करण्यासाठीची संमती आहे त्यामध्ये मी सहमत आहे ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करून आपण या KYC प्रक्रियेसाठी सहमती दाखवून आपल्याला ओटीपी येईल.
Ladki Bahin Ekyc Process
  • यानंतर आपल्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबर ला एक 06 अंकी ओटीपी येईल तो ओटीपी आपल्याला पुढील बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि ओटीपी टाकून सबमीट करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपण केवायसी च्या पुढच्या टप्प्यावर जाणार आहोत.
Ladki Bahin Ekyc Process
  • पण या केवायसी मध्ये सरकार कडून एक ट्विस्ट आलेला आहे तो ट्विस्ट म्हणजे आपल्याला आपल्या सोबतच आपल्या वडिलांचे किंवा आपल्या पतीच्या आधार कार्डचा क्रमांक टाकून त्यांचे देखील ई केवायसी करायचे आहे. ती सुद्धा पद्धत वरील प्रमाणेच सेम आहे खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडिलांचे किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून सोबत दिलेला Captcha टाकून मी सहमत आहे या पर्यायावर ती क्लिक करायचं आहे. आणि परत एक ओटीपी तो ओटीपी आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Ladki Bahin Ekyc Process
  • वडिलांच्या किंवा पतीच्या आधारशी संलग्न असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून झाल्यानंतर पुढील प्रमाणे आपल्याला एक माहिती चे 1 व 2 असे पर्याय मिळतील. ते वाचून त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपलं जात प्रवर्ग तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी वगैरे असे जे डिक्लेरेशन्स आहेत ते एक आणि दोन असे आपल्याला स्वयंघोषणापत्र सारखे दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला पर्याय निवडून सबमिट करा या माहितीवर क्लिक केल्यानंतरच आपण आपली केवायसी पूर्ण झाली असे समजू शकतो.
Ladki Bahin Ekyc Process
  • यामध्ये वडिलांचे पतीचे नाव असेल त्यानंतर जात प्रवर्ग मध्ये अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती सर्वसामान्य अशा जातींचा प्रवर्ग असेल त्यासोबतच
  • माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. Ladki Bahin Yojana
  • असा एक डिक्लेरेशन येत त्यामध्ये आपल्याला निवडा या पर्यायावर क्लिक करून हो किंवा नाही असं सिलेक्ट करायचा त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला हो किंवा नाही असा पर्याय निवडून खाली दिलेलं उपरोक्त अनुक्रमांक एक व दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील यात बॉक्स वरती क्लिक करायचे आणि सबमिट करा या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
  • सदरच्या माहितीचा अर्ज भरताना किंवा हा केवायसी चा फॉर्म भरताना जी माहिती आहे ती खरी व बरोबर द्यावी नसेल तर या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आपल्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात येतील तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे जर आपल्या खात्यावरती मिळत असतील आणि आपण कोणत्याही प्रकारची खोटी माहिती सरकारला पुरवली असेल तर आपल्याला ते पैसे देखील शासनाला परत द्यावे लागतील. ही खबरदारी घेऊन मगच आपण ही केवायसी करावी अन्यथा आपली केवायसी ग्राह्य धरण्यात येणार नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक असल्यास मुळे आपल्याला आपण जर खोटी माहिती दिली तर ते सगळी माहिती पुढे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तसेच सरकारच्या आरटीओ डिपार्टमेंट कडे या संदर्भातील सर्व पुरावे कागदपत्रे असणार आहेत तर माहिती देताना आपण कोणत्याही प्रकारचे खोटी माहिती इथे देऊ नका.
  • सर्वात शेवटी आपली केवायसी पूर्ण झाली याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला असा Success चा मेसेज तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज आल्यानंतरच आपली केवायसी पूर्ण झाली आहे असे समजावे.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि या माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरीबघा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवा.

आणि आपल्या लाडक्या बहिणीला ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना केवायसी कशी करावी याबाबतीतील सर्व संभ्रम दूर होतील.


Leave a Comment