ladka Bhau Yojana 2024 – लाडकी बहीण योजना नंतर आता मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना चालू झालेली आहे. या योजनेची माहिती खालील प्रमाणे आहे. या योजनेच्या अंतर्गत बारावी पास आणि पदवीधर तरुणांना महिन्याला 6000 ते 10,000 रुपये मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. तरुणांसाठी खूप आनंदाची बातमी आहे या योजनेला आवश्यक असणारी पात्रता, योजनेचे फायदे, अर्ज कसा करावा किंवा अर्जाची तारीख या सगळ्या गोष्टी आपल्याला खाली दिलेल्या तर तुम्ही ही माहिती बघून मगच हा अर्ज भरावा व या योजनेचा फायदा घ्यावा.
Table of Contents
Ladka Bhau Yojana 2024
योजनेचे नाव – लाडका भाऊ योजना ( Ladka Bhau Yojana ) |
मिळणारा लाभ – 6000 ते 10,000 रुपये. |
योजनेसाठी पात्रता – 12 वी, ITI व पदवीधर |
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन |
ladka Bhau Yojana Eligibility Criteria – Documents
- अर्जदाराचे कमाल वय 18 व किमान वय 35 असावे.
- अर्जदाराची किमान पात्रता 12 वी पास, ITI , किवा पदवीधर असावी.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे आधार कार्ड असावे.
- आधार कार्ड व बँक पासबुक लिंक असावे.
- अर्जदाराने कौशल्य,उद्योजगता,व नाविन्यता विभागाच्या या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/indexसंकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी.
- आस्थपना उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा.
- आस्थापना उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी.
ladka Bhau Yojana फायदे
- सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.
- सदर प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असेल व या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल.
- विद्या वेतन म्हणजे 12 वी पास साठी 6000/- ITI वाल्यांसाठी 8000/- आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर यांच्यासाठी 10,000/- असेल.
- सदर विद्यावेतन अर्जदाराच्या/लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट जमा ( DBT) करण्यात येणार आहे.
ladka Bhau Yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राहिवासी दाखला किवा डोमासाईल दाखला
- जन्म दाखला
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असला पाहिजेल.
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईझ फोटो
वरील कागदपत्रे हि फायनल कागदपत्रे नाही आहेत. या मध्ये मा. महाराष्ट्र शासन बदल करू शकते. हि संभाव्य कागदपत्रे आहेत.
Ladka Bhau Yojana 2024 असा करा अर्ज ?
- आपल्याला सर्वप्रथम वरील पैकी सर्व कागदपत्रे गोळा करावयाची आहेत.
- त्यानंतर ladka Bhau Yojana च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे. (वेबसाईट अजून उपलब्ध नाही आहे.)
- नवीन रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर वेबसाईट वर सर्व माहिती भरून आपल्याला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट वर क्लीच्क करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
- पण सर्वात महत्वाचे यासाठी आपल्यालां महास्वयमं या सरकारच्या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.
- त्यासाठी आपल्याला आधार कार्ड शी सलग्न असलेला मोबाईल नंबर वापरून हि प्रोसेस करायची आहे.
ladka Bhau Yojana कोणत्या राज्यामध्ये आहे ?
फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये हि योजना आहे.
ladka Bhau Yojana मध्ये आपल्याला किती रुपये मिळतात ?
या योजनेमध्ये 12 वी पास अर्जदारास 6000/- ITI झालेल्या अर्जदारास 8000/- व पदवीधर अर्जदारास 10,000 /- रुपये मिळतात.
Ladka Bhau Yojana 2024 अधिक माहितीसाठी आपण आमच्या nokaribagha च्या youtube channel ला भेट द्या.
हे पण वाचा - Majhi Ladki Bahin Yojana 2024 (योजनेत झालेत 4 बदल)