Airtel Scholarship 2025 : १०० कोटींची स्कॉलरशिप योजना.. फक्त विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Airtel Scholarship 2025 – भारती एअरटेल फाऊडेशन ने 2024 पासून खास विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप योजना सुरु केली आहे. या अंतर्गत 100 कोटींच्या निधीसाठी देशातील गोरगरीब आणि गुणवंत विद्यार्थ्याना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते.

Airtel Scholarship 2025

या योजनेमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे मुलीना प्राध्यान्य देण्यात येत आहे. व विद्यार्थ्याना 100 % फी माफी,होस्टेल,आणि जेवणाच्या खर्चाची पूर्तता कंपनी द्वारे केली जाणार आहे. तसेच प्रथम वर्षात लॅपटाॅप देखील मोफत दिला जाणार आहे.

Airtel Scolarship Yojana – योजनेची वैशिष्टे

वंचित, गरीब पण कष्टाळू पार्श्वभूमीतील विद्यार्थ्याना तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्य घडवण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख वैशिष्य आहे.

भारती एअरटेल टेक्नोलॉजी शिष्यवृत्ती योजना

लाभ माहिती
वार्षिक फी100 % फी शिष्यवृत्ती मधून भरली जाईल
(युनिव्हर्सिटी स्ट्रक्चर प्रमाणे)
होस्टेल व मेस शुल्क संपूर्ण भरली जाणार
लॅपटाॅपपहिल्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला लॅपटाॅप दिला जाईल.
कालावधी UG व 5 वर्षाचे इंटेग्रेटेड कोर्सेस. पूर्ण कालावधीसाठी
फिनिशिंग कमीटमेंटशिक्षण पूर्ण झाल्यावर एका विद्यार्थ्याला शैक्षणिक सहाय्य देण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल.

Airtel Scholarship 2025 Scolarship Yojana Eligibility

स्कॉलरशिप पात्रता

  • या स्कॉलरशिप ला अर्ज करण्यापूर्वी आपल्याला काही खालील पात्रता अटी दिलेले त्यामध्ये आपण बसणे आवश्यक आहे यामध्ये पहिली अट अशी आहे की,
  • अर्जदार विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे, त्याचा त्यासंबंधीतील रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल दाखला असणे आवश्यक आहे.
  • 2025 – 26 साठी अभियांत्रिकी किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स चा प्रवेश हा निश्चित असायला हवा.
  • अर्जदाराने NIRF 2024 मध्ये टॉप 50 अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश घेतलेला असावा.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8.5 लाखाच्या आत मध्ये असावे.
  • खालीलपैकी ज्या कॅटेगरीमध्ये आपण येत असेल त्यांना प्राधान्य दिले जाईल त्यामध्ये मुली, दिव्यांग, एक पालक, किंवा पालक नसलेले यांना प्राधान्य दिले जाईल.
  • तसेच सोबत दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती (Same Purpose) साठी घेतलेली नसावी.
  • आधार कार्ड
  • चालू वर्षाचे प्रवेश पत्र ( विद्यापीठ संस्थेचे शुल्क पत्र)
  • बारावीची मार्कशीट
  • JEE Score Card किंवा विद्यापीठ प्रवेशात परीक्षेचा स्कोरकार्ड
  • पालकांच्या उत्पन्नाची कागदपत्रे
    • जर पगारदार असतील तर नवीन आयकर रिटर्न फॉर्म आणि मागील सहा महिन्याचे स्टेटमेंट.
    • जर कर उत्पन्न नसेल तर सरकारने जारी केले उत्पन्न प्रमाणपत्र आणि मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • संस्थेचे बँक खात्यांचा तपशील
  • अर्जदारांचा पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराकडून उद्देशाने विधान म्हणजेच (SOP)

Airtel Scholarship 2025 Selection Process

  • सिलेक्शन प्रोसेस निवड प्रक्रिया
  • अर्ज स्वीकारल्यानंतर भारतीय रिटेल फाउंडेशन निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांची विविध टप्प्यांमध्ये निवड करते, यामध्ये आपल्याला आर्थिक गरज आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी सोबत शैक्षणिक गुणवत्ते बरोबर विचार केला जातो.
  • निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भारती स्कॉलर्स अशी ओळख मिळते
  • लायब्ररी, इंटरनेट फी, नुकसान भरपाई त्याची छोट्या खर्चासाठी शिष्यवृत्ती कव्हर नसतो. ते विद्यार्थ्यांनाच भरावे लागतात तर याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
  • जर एअरटेल स्कॉलरशिप 2025 साठी कोणतीही चुकीची माहिती पुरवली गेली असेल तर शिष्यवृत्ती रद्द केली जाईल हे सर्व अधिकार एअरटेल स्कॉलरशिप ने आपल्याजवळ ठेवले आहेत, तसेच स्कॉलरशिप चे सर्व रक्कम परत मागवली जाईल.
  • दिलेल्या लॅपटॉप हरवला किंवा खराब झाला तर त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असणार आहे.

How To Apply Airtel Scholarship 2025

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा तर त्यामध्ये आपल्याला एरटेल स्कॉलरशिप 2025 शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच भारती एअरटेल फाउंडेशन वर अर्ज सादर करून अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी अपलोड करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण एअरटेलची ही स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकता.

भारती एअरटेल स्कॉलरशिप योजना 2025 ही एक सुवर्णसंधी आहे. जी केवळ आर्थिक मदत नाही तर.. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची भावना निर्माण करते आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. आणि वरती दिलेल्या प्रमाणे सर्व प्रोसेस करून या स्कॉलरशिपला लवकरात लवकर अर्ज करावा.

अशाच नवनवीन माहितीसाठी nokaribagha ला फॉलो करा.

Leave a Comment