Assam Rifeles Bharti 2026 – आपण पण जर स्पोर्ट्स पर्सन असाल आणि कोणत्यातरी एका खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शालेय खेलो इंडिया विद्यापीठ वगैरे इत्यादी कोणतेही स्पर्धांमध्ये सहभागी झालेले असाल, तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. आपल्यासाठी आसाम रायफल्स मध्ये नोकरीची संधी आली आणि यामध्ये 95 जागांसाठी ही भरती असणार आहे. Jobs 2026
Assam Rifeles Bharti 2026, Assam Rifles Recruitment 2026, Jobs 2026
थोडक्यात
| एकूण पदसंख्या | 95 पदे |
| पदाचे नाव | रायफलमन (जनरल ड्युटी ) [खेळाडू] |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2026 |
जाहिरात क्र – 12016/A Branch (Rect Cell)/2025/716
एकूण पदसंख्या – 95 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | रायफलमन/ रायफल वूमेन (जनरल ड्युटी ) [खेळाडू] | 95 |
| एकूण | 95 |
शैक्षणिक पात्रता (Assam Rifeles Bharti 2026 Educational Qualifications)
- 10 वि पास
क्रीडा पात्रता (Sportsperson jobs 2026)
- कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धा/राष्ट्रीय स्पर्धा/शालेय खेळ/खेलो इंडिया विद्यापीठ खेळ व इतर कोणत्याही खेळांमध्ये सहभागी झालेले खेळाडू
वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे
- SC/ST – 05 वर्षे सुट
- OBC – 03 वर्षे सुट
फी
- सर्वसाधारण / ओबीसी – 100 /- रु
- महिला/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती – फी नाही
पगार – 07 व्या वेतन आयोगाप्रमाणे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Assam Rifeles Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | फेब्रुवारी ते मे 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Assam Rifeles Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदर भरती चा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला सर्वात प्रथम जाहिरात वाचून घ्यायचे कारण यामध्ये फक्त स्पोर्ट पर्सन अर्ज करू शकतात म्हणजे ज्यांनी कोणत्यातरी खेळामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शालेय खेलो वगैरे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असेल आणि त्याचे त्यांच्याजवळ प्रमाणपत्र असतील त,र फक्त आणि फक्त तेच लोक तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे ही भरती कोणासाठी ही नाही आहे. फक्त खेळाडू या भरतीला अर्ज करू शकतात.
- फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेली जाहिरात वाचायचे आहे जाहिरातीमध्ये प्रत्येक खेळ त्या खेळासाठी असलेल्या पदांची संख्या त्या पदाचे नाव इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे तसेच त्यासाठी लागणारी संबंधित शैक्षणिक पात्रता व खेळाडूंची पात्रता इत्यादी माहिती देखील दिली आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित व नीट भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर असल्याची खात्री करावी आणि मगच या भरतीसाठी लागणारी फी भरावी फी ही प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या असेल ती माहिती आपल्याला वरती जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म चेक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी तसेच आपण फी भरलेल्या फीच्या पावतीचे देखील एखांदी प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना आपण जो ईमेल आयडी व पासवर्ड किंवा मोबाईल नंबर वापरणार आहात तो आपला कायमस्वरूपी व चालू स्थितीत असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा कारण आपण जर बंद नंबर दिला किंवा आपण फॉर्ममध्ये नंबर वापरला आणि नंतर बंद केला तर आपल्या कोणत्याही प्रकारचा संपर्क हा आसाम रायफल्स च्या अधिकृत सिस्टीमशी होणार नाही त्यामुळे आपल्याला अडचण येऊ शकते.
- सदरची माहिती आपल्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून तुमच्या मदतीने कोणालातरी सरकारी नोकरीचा हा फायदा मिळू शकेल.
- अशाच नवनवीन माहितीसाठी भरतीसाठी तसेच प्रवेश पत्रांसाठी आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप किंवा युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपला वरती लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चैनल किंवा whatsapp च्या ग्रुपला अगदी विनाशुल्क जॉईन व्हा.