SSC Delhi Police Constable Bharti 2025 – फक्त बारावी (After Hsc Jobs) पास वर नोकरीसाठी संधी आलेली आहे, ती पण दिल्ली पोलीस मध्ये. होय मित्रांनो आपण पण जर ही माहिती बघत असाल तर लवकरात लवकर अर्ज भरा फक्त बारावी पास या शैक्षणिक पात्रतेवर आपण देखील दिल्ली पोलीस मध्ये एक हक्काची नोकरी मिळवू शकता. आणि जवळपास 70 हजार रुपये इतका पगार कमवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, पगार ही सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. सोबतच अर्जाची तारीख सुद्धा दिली आणि अर्ज करण्यासाठी लिंक ही दिलेली आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नका 21 ऑक्टोंबर पूर्वी अर्ज करा आणि आपली ही नोकरी मिळवा. Jobs in SSC
SSC Delhi Police Constable Bharti 2025, SSC Jobs, SSC Recruitment
जाहिरात क्र – नमूद नाही.
एकूण पद्संख्या – 7565 पदे
परीक्षा – दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पुरुष & महिला (Jobs in Delhi)
पदाचे नाव व तपशील –
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | कॉन्स्टेबल पुरुष | 4408 |
| 2 | कॉन्स्टेबल पुरुष (Others) | 285 |
| 3 | कॉन्स्टेबल पुरुष (EXSM Commando) | 376 |
| 4 | कॉन्स्टेबल महिला | 2496 |
| एकूण | 7565 |
SSC Delhi Police Constable Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- 12 वी पास
वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (Indian Jobs)
फी –
- General/ OBC – 100 /- रु
- SC/ST/EXSM/महिला – फी नाही.
पगार (Salary) – 21,700 – 69,100 /- (Group C )
अर्जाची पद्धत –
SSC Delhi Police Constable Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
| अर्ज सुरु झालेली तारीख | 22 सप्टेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 ऑक्टोंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
SSC Delhi Police Constable Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
| जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
| ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
| नोकरीबघा Whattsapp ग्रुप | क्लिक करा |
असा करा अर्ज
- या भरतीसाठी सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला जाहिरात बघायचे आहे त्याशिवाय आपण हा फॉर्म भरू नका.
- कारण अशी बरीचशी माहिती आहे की जी आपल्याला या आर्टिकल मध्ये कव्हर करता आले नाही ती सर्व माहिती तुम्हाला याच्या जाहिरातीमध्ये भेटून जाईल.
- माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा त्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता वयाची अट जाहिरात तसेच अर्जाची लिंक या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत.
- जर आपण SSC मध्ये अगोदर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड केवायसी करून आपल्याला आपला फोटो सही वगैरे सर्व गोष्टी अपलोड कराव्या लागणार आहेत आणि त्यानंतरच मग आपण या भरतीचा फॉर्म जमा करू शकता.
- विचारलेली सर्व माहिती तसेच आपल्या दहावी बारावी या शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट तसेच सर्टिफिकेट वरील माहिती अचूक व बरोबर टाकावे.
- त्यानंतर आपल्याला यामध्ये फोटो व सही सहा महिन्याच्या अगोदर चा फोटो अपलोड करायचा आहे तशीच सुस्पष्ट व व्यवस्थित सही अपलोड करायचे आहे.
- विचारलेली शैक्षणिक तपशील योग्य व बरोबर द्यावा जेणेकरून आपल्या फॉर्म कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट होणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म एकदा चेक करून मगच आपण फी साठी पुढे प्रोसेस करायची आहे.
- संपूर्ण माहिती वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- तांत्रिक मदतीसाठी जाहिराती मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.