2025 ची सर्वात मोठी भरती निघालेली आहे. इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये जवळपास 21413 इतक्या पदांसाठी भरती निघालेली आहे.

सदर भरती हि महाराष्ट्र  उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये असणार आहे.

या भरती मध्ये ASSISTANT BRANCH POSTMASTER, BRANCH POST MASTER / DAK SEVAK हि पदे भरली जाणार आहेत.

या भरतीं मध्ये दिला जाणारा पगार हा त्या पदाला अनुसरून राहणार आहे. साधारण 10,000- 30,000 /- रु. पर्यंत हा पगार असणार आहे.

१८ ते ४० वर्षापर्यंत चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. जर आपण अनुसूचित जाती / जमाती किवा इतर मागास वर्गात येत असाल तर आपल्याला सूट राहील ..अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रते साठी आपण संपूर्ण जाहिरात वाचावी. तसेच या भरतीसाठी आपल्याला कॉम्प्युटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे तसेच सायकल चालवता येणे देखील बंधन कारक आहे.

या फॉर्म साठी फी आपण जर सर्वसाधारण मध्ये येत असाल तर फक्त 100 रुपये भरायची आहे, महिला अर्जदार व अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली गेली नाही आहे.

फॉर्म भरताना आपल्या जवळ आपले आधार कार्ड , दहावी,बारावी शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच आपला जातीचा दाखला व चालू आयडेंटी साईझ फोटो व सही लागणार आहे.

भरतीच्या अधिक माहितीसाठी व इतर महत्वाच्या माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करून आपण नोकरीबघा च्या अधिकृत वेबसाईट वरून माहिती घेऊ शकता.