केंद्र सरकार असुदे किवा असुदेल राज्य सरकार महिलांसाठी दोन्ही कडून म्हणजेच राज्य सरकार व केंद्र सरकारकडून खूप महत्वाच्या schemes उपलब्ध करून देनेत आल्या आहेत.

 सध्या तरी महाराष्ट्र शासनाची सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण देखील महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर या योजनेची माहिती घेऊन या योजनेसाठीचा अर्ज भरू शकता

 तसेच 2024 साली सुरू केलेली एलआयसीची विमा सखी योजना ही योजना 18 ते 70 वयोगटातील महिला ज्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असे कोणीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

 तसेच दिल्ली सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केली या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना 2100 रुपये दिले जातात. या योजनेची माहिती तुम्हाला दिल्ली सरकारच्या वेबसाईट वरती मिळून जाईल

 तसंच कर्नाटक सरकारची महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली होती यामध्ये महिलांना दरवर्षी दहा हजार रुपयांचा हप्ता मिळणार तसेच या योजनेसाठी 21 ते 60 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.

 ज्या महिलांचे पती वारले असतील अशा महिलांसाठी त्यांची मुले अठरा वर्षाची होईपर्यंत संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासन राबवते. यामध्ये आपल्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम दर महिना आपल्या खात्यावरती जमा होते

 तसेच आपले 2024 नंतरचे पहिल्या आपत्य मुलगी असल्यास शासनाकडून एक लाख दहा हजार रुपये इतक्या रकमेचे लेक लाडकी योजना देखील महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाते

 सोबतच महाराष्ट्र सरकारची मातृ वंदना योजना ज्यामध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांना पहिल्या पत्त्यासाठी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या पत्ते मुलगी असल्यास सहा हजार रुपये चा लाभ दिला जातो.

 तसेच जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन,  सुकन्या समृद्धी, योजना इत्यादी बऱ्याचशा योजना या सरकारमार्फत राबवल्या जातात.