अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेलं एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान टेकऑफनंतर अवघ्या सहा मिनिटांत दुर्घटनाग्रस्त झालं

12 जून 2025 रोजी झालेल्या या अपघातात जवळपास सर्वच मृत्युमुखी पडल्याची वार्ता येत आहे. या मध्ये एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते.

विमानातील एकूण प्रवाश्यांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. माजी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही या विमानात प्रवासी होते,

विमान मेघाणी नगर येथील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळलं. या इमारतीत ७५ मृतदेह सापडले असून, ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ४१ जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर केंद्रीय गृह्मंती अमित शाह हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. जखमी झालेल्यांसाठी बचाव कार्य देखील चालू आहे. भारतीय लष्कर देखील या ठिकाणी आहे.

टाटा सन्स ने मृतांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत जाहीर केली आहे. बऱ्याच देशांकडून या घटनेसाठी शोक व्यक्त केला जात आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि व्हॅटिकनचे पोप फ्रान्सिस यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत मदत कार्याची माहिती दिली.

सदर दुर्घटनेचे कारण तपास माध्यमांमार्फत चालू आहे. हवामान स्थिर असताना विमानाने टेकऑफनंतर लगेचच 'मेडे' कॉल केला होता, परंतु त्यानंतर संपर्क तुटला व हि दुर्घटना झाली असे माध्यमांचे म्हणणे आहे.