1. भारत सरकारने पी एम किसान ही योजना खास शेतकऱ्यांसाठी आणली आहे यामध्ये 02 हेक्टर पेक्षा कमी शेती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

1. या योजनेचा मूळ उद्देश्य हा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना तसेच या शेतामध्ये काहीही पिकत नाहीये अशा शेतकऱ्यांना प्रवाहात आणून त्यांना दरवर्षी केंद्र शासनाचे  6000 /- रुपये व राज्य शासनाचे 6000 रुपये असे 12000 रुपये देणे हा आहे.

हे पैसे पेन्शन स्वरूपात आपल्याला दर चार महिन्यांनी 2000/-  रुपये अशा टप्प्याने मिळणार आहेत. पुढीलप्रमाणे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

1. या योजनेकरिता आपले आधार कार्ड शेताचा उतारा आपले बँक पासबुक व रेशन कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

1. ही कागदपत्रे घेऊन आपण आपल्या जवळच्या कृषी अधिकारी किंवा तालुकास्तरावरील अधिकारी यांच्याकडून हा फॉर्म भरून घेऊ शकता जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये देखील हा फॉर्म भरून मिळतो.

एकदम अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना म्हणजे जणू काही वाळवंटामध्ये पाणी मिळाल्यासारखे आहे फक्त या योजनेचा फायदा लवकरात लवकर घ्यावा

अधिक माहितीसाठी आपल्या नोकरी पदाच्या व्हाट्सअप ग्रुपला ॲड व्हा जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप वरती मिळत राहील